Tarun Bharat

• काकती येथे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

  • वार्ताहर/ काकती
  • येथील नवनिर्वाचित काकती ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
  • कार्यक्रमात बाबासाहेब कांबळे यांनी स्वागत केले. नुतन ग्रा. पं. सदस्य ज्योती गवी यांनी मनोगत व्यक्त केले. ज्योती गवी यांनी ग्रा. पं. सदस्यपदी पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल मतदार बंधू भगिणीचे ऋण मानून, नव्या उमेदीने कार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार म्हणाले, गावच्या सर्वांगिण विकासाकरिता मतभेद बाजुला सारून प्रत्येकांनी मुलभूत सुविधा कल्याणकारी योजना पारदर्शकतेने गरीबांपर्यंत पोहोचवण्यात असे मार्गदर्शन केले. यावेळी पाचव्यांदा निवडून आलेल्या सदस्यांचा शाल व पुष्पहार व नुतन सदस्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. वर्षा वाजरे यांनी आभार मानले.

Related Stories

पदवीदान समारंभावेळी विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

Amit Kulkarni

गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

tarunbharat

पशुसंजीवनी योजनेंतर्गत पशुपालकांपर्यंत सुविधा पुरविणार

Omkar B

शिवमय वातावरणात पार पडली दौड

Patil_p

पाणी गळतीच्या ठिकाणी ट्रक रुतला

Amit Kulkarni

सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट

Patil_p