18 मिनिटांपर्यंत मधमाशांसोबत राहिली अभिनेत्री
जगप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली सामाजिका कार्य आणि पर्यावरणासंबंधी स्वतःच्या योगदानासाठी चर्चेत असते. अँजेलिनाने आता मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरता तिने एक अत्यंत धोकादायक फोटोशूट करवून घेतला आहे. अँजेलिनाच्या शरीरावर मधमाश्या 18 मिनिटांपर्यंत घोंगावत राहिल्या.
अँजेलिनाने नॅशनल जियोग्राफिक नियतकालिकासाठी हे फोटोशूट करविले आहे. हे फोटोशूट वर्ल्ड बी डे (20 मे) रोजी मधमाशी पालनाला प्रोत्साहित करण्यासाठी होते. फोटोशूटच्या छायाचित्रांनी लोकांना अवाप् करून सोडले आहे.
छायाचित्रांमध्ये अँजेलिना एका ऑफ-शोल्डर व्हाइट ड्रेसमध्ये दिसून येत. मधमाशांसोबत छायाचित्रे काढून घेणे हिमतीचे आहे. अँजेलिनाचे हे फोटोशूट प्रसिद्ध छायाचित्रकार डॅन विंटर्स यांनी केले आहे. डॅन यांनी या फोटोशूटसाठी 40 वर्षे जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
अँजेलिना दीर्घकाळापासून युनेस्को आणि गुइरलेनसोबत काम करत आहे. फोटोशूटसाठी इटालियन मधमाशांचा वापर करण्यात आला आहे. अँजेलिना वगळता सर्वांनी फोटोशूटवेळी प्रोटेक्विट सूट परिधान केला होता.