वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स
अँटवर्प फुटबॉल क्लबने शनिवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात ब्रुगी क्लबचा अंतिम सामन्यात निसटता पराभव करत बेल्जियन फुटबॉल चषक पटकाविला. या अंतिम सामन्यात अँटवर्प क्लबने ब्रुगी क्लबचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
कोरोना महामारी सुरू झाल्याने मार्च महिन्यानंतर बेल्जियममध्ये लीग फुटबॉल स्पर्धेला फेरप्रारंभ करण्यात आला. शनिवारच्या अंतिम सामन्यात अँटवर्पतर्फे एकमेव निर्णायक गोल 25 व्या मिनिटाला इस्त्रायलचा 34 वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रिफेलोव्हने नोंदविला. गेल्या 28 वर्षांच्या कालावधीतील अँटवर्प क्लबचे हे पहिले यश आहे. या स्पर्धेतील हा अंतिम सामना 22 मार्च रोजी आयोजित केला होता पण कोरोनामुळै तो लांबणीवर टाकण्यात आला आणि हा सामना तब्बल चार महिन्यानंतर शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी खेळविला गेला.