नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी डोमनिकामध्ये जामीन मंजूर झाल्यावर अँटिग्वा आणि बारबुडामध्ये पोहोचला आहे. डोमनिकामध्ये अवैध मार्गाने प्रवेश केल्याच्या आरोपाखाली चोक्सी 15 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिला होता. भारतामधून फरार झाल्यापासून चोक्सी 2018 मध्ये अँटिग्वा आणि बारबुडामध्ये राहत आहे. त्याने तेथील नागरिकत्वही मिळविले आहे. चोक्सीच्या विरोधात डोमनिकामध्ये अवैधमार्गाने प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर त्याचे अपहरण करण्यात आले होते असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. डोमिनिका उच्च न्यायालयाने चोक्सीला उपचारासाठी जामीन दिला आहे. 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळय़ातील आरोपी चोक्सी 23 मे रोजी अँटिग्वा आणि बारबुडातून बेपत्ता झाला होता.
Previous Articleपुष्कराज कीर्तनात दंग
Next Article जूनमध्ये निर्यात 48 टक्क्यांनी वाढली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.