ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत एका नवजात मुलीच्या शरीरात कोरोनाच्या ‘अँटिबॉडिज’ आढळून आल्या आहेत. अशा प्रकारची जगातील ही पहिलीच घटना आहे.
फ्लोरिडाच्या अटलांटिक विश्वविद्यालयाचे सह लेखक पॉल गिल्बर्ट म्हणाले, यापूर्वी कोरोनामुक्त गरोदर स्त्रियांच्या पोटातील बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात आईशी जोडलेली नाळ अयशस्वी ठरत होती. मात्र, आता पहिल्यांदाच नवजात बाळाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज आढळण्याचे हे प्रकरण समोर येत आहे.
या बाळाच्या आईने ती 36 आठवड्यांची गर्भवती असताना ‘मॉडर्ना’ची पहिली लस घेतली होती. लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी तिने मुलीला जन्म दिला. हे बाळ पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त आहे. बाळाच्या आईला नियमांनुसार, लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे.