मुंबई \ ऑनलाईन टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
संतोष शेलार आणि आनंद जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांना एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एकत्र करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी सचिन वाजे, रियाजुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार,आनंद जाधव या सर्वांचा समावेश आहे.