वृत्तसंस्था/ केपटाऊन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 28 व्या वेळी पाच बळी मिळवित भारताचा रविचंद्रन अश्विन इंग्लंडचा माजी गोलंदाज इयान बोथम यांना मागे टाकले.
अँडरसनने दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी हा पराक्रम नोंदवला. अश्विन व बोथम यांनी प्रत्येकी 27 वेळा कसोटी डावात पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 5 बळी सर्वाधिक वेळ मिळविणाऱयांच्या यादीत अँडरसन आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे. लंकेचा माजी स्पिनर मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटीत 67 वेळा हा पराक्रम नोंदवत अग्रस्थानी आहे. भारताचा अनिल कुंबळे (132 कसोटीत 35 वेळा) या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अँडरसनने फॅफ डु प्लेसिस, प्रिटोरियस, केशव महाराज, रबाडा व ऍन्रिच नॉर्ट यांचे बळी मिळविले.