वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सर्वाधिक बळी मिळविणाऱयांत भारताच्या अनिल कुंबळेचा 619 बळींचा विक्रम मागे टाकला. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत त्याने शुक्रवारी केएल राहुलला बाद करून हा पराक्रम केला.
अँडरसन आता तिसऱया स्थानावर असून लंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 बळी नोंदवत पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न 708 बळींसह दुसऱया स्थानावर आहे. अँडरसनची ही 163 वी कसोटी असून त्याने 2003 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. मुरलीधरन, वॉर्न व कुंबळे हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत तर अँडरसन हा कसोटीतील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज बनला आहे.