सैनप्रॅन्सीको
गुगलने अँड्रॉईड, आयओएस स्मार्टफोन्स वापरकर्त्यांसाठी गुगल मीटची व्हिडिओ चॅटची सुविधा उपलब्ध केली आहे. आता ग्राहकांना मीट टु जीमेल या सेवेद्वारे ग्राहकांना व्हिडिओ मिटींग्ज सहज घेता येणार आहेत. लवकरच कंपनी मीट टॅबची सुविधा देणार आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्सरन्सचे महत्त्व वाढले आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊनच गुगलने नवी सुविधा अँड्रॉईड व आयओएस स्मार्टफोन्स धारकांसाठी उपलब्ध केली आहे.