प्रतिनिधी/कोल्हापूर
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे (आठवले) प्रदेश सचिव अँड.पंडितराव सडोलीकर यांचे मंगळवारी पहाटे दुःखद निधन झाले.
अँड. सडोलीकर गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी ते आपल्या वकीलकिच्या माध्यमातून सतत अग्रेसर असत, तसेच ते न्यायासाठी अन्यायाविरोध वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचे ते काम करीत असे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे (आठवले) गटाचे व आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.