मांजरी : अंकली येथे श्री रेणुका देवीची यात्रा उत्साहात झाली. तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात सोमवारी सकाळी रेणुका देवीचा जग करका ओढय़ामध्ये आणण्यात आला. तेथे पूजन करून मिरवणुकीने रेणुका देवीचा जग कृष्णा काठावर आणण्यात आला. कृष्णेच्या काठावर सायंकाळपर्यंत भाविकांनी कृष्णा नदीत स्नान करून लिंब नेसून पूजा केली. सायंकाळी देवीचा जग मिरवणुकीने रेणुका देवीच्या मंदिरात आणण्यात आला. मंदिराबाहेरील मंडपात देवीची प्रति÷ापना करण्यात आली. रात्री रेणुकादेवीच्या गीतांचा व चैंडके पदाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी भाविकांकडून कडबूचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी भाविकांना जुन्या परडय़ा घेऊन नवीन परडय़ा देण्यात आल्या. पारंपरिक वाद्याच्या गजरात व देवीच्या जयघोषात भंडाऱयाची उधळण करून आरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. बुधवारी दिवसभर नैवेद्य देण्यात आला तर सायंकाळी देवीची मंडपातून मंदिरात प्रति÷ापना करण्यात आली व यात्रेची सांगता करण्यात आली. दरवषी अंकली येथून यल्लम्मा डोंगर येथे यात्रा जात असते. यावेळी मात्र कोरोनामुळे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने अंकली येथे यात्रा करण्यात आली.
Previous Articleमटण मार्केटमधील 5 गाळय़ांना मनपाचे टाळे
Next Article पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.