प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मिसेस जैन झाली आहे. 14 डिसेंबरला अंकिता विकी जैनसोबत लग्न बंधनात अडकली. नुकताच अंकिताने लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत मराठमोळय़ा पद्धतीने अन् आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मैत्रिणीसोबत साजरा केला आहे. तिने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आपल्या कुटुंबातील स्त्रियांसोबत हळदी-कुंकू करताना दिसते आहे. याशिवाय व्हिडिओत अंकिताने काळय़ा रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधाने केलेलेही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात नववधू तिच्या पहिल्या मकर संक्रांतीला काळय़ा रंगाची साडी नेसून त्यावर हलव्याचे दागिने परिधान करून आणि हळदी-कूंकू करण्याची प्रथा आहे. याप्रमाणेच अंकितानेही अगदी पारंपरिक पद्धतीने तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली. अंकिता लोखंडेने बॉयप्रेंड विकी जैनसोबत 14 डिसेंबर रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच लग्न झाल्यापासून अंकिता विकीसोबतचे फोटो शेअर करत असते. बऱयाचदा तिचे फोटो चर्चेत येत असतात.
संकलन – अनुराधा कदम