वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी वर्ल्ड चॅम्पियन अंकुर मित्तलने पतियाळा येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करणाऱया अंकुरने अंतिम फेरीत 43 गुण मिळविले तर राजस्थानच्या आदित्य भारद्वाजने 40 गुण घेत रौप्य मिळविले. उत्तर प्रदेशच्या रय्यान रिझवीने कांस्य मिळविताना शेवटच्या फेरीत 33 गुण नोंदवले. अंकुरने पात्रता फेरीत 125 पैकी 117 गुण घेत तिसरे स्थान मिळविले होते. या फेरीत झोरावर संधूने 119 गुण नोंदवत पहिले स्थान मिळविले होते. भोपाळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत मध्यप्रदेशच्या बंधवी सिंगने महिलांच्या 50 मी. प्रोन प्रकारात दुहेरी सुवर्ण पटकावले. तिने वरिष्ठ व कनिष्ठ गटातील दोन्ही पदके पटकावली. तिने 626 गुण नोंदवले.