बेळगाव / प्रतिनिधी
वॉर्ड क्र. 4 मधील म. ए. समितीचे उमेदवार तसेच म. ए. युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश अ. केसरकर यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर त्या भागातील महिलावर्ग स्वयंस्फूर्तीने घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करीत आहेत. तरुण, ज्येष्ट मंडळीसह महिलांचा पाठिंबा मिळविण्यात अंकुश अ. केसरकर यांना यश मिळाले आहे.
घरोघरी जाऊन प्रचार करताना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महिलावर्ग आणखी जोमाने प्रचारकार्यात काम करताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या भागातील परिचित व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक पातळीवर त्यांचा प्रचार करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. प्रचारादरम्यान अनेक भागात बैठका घेऊन पाठिंबा मिळविण्यात यश मिळाले आहे. कायमच मराठी भाषेसाठी आग्रही राहून वॉर्डाच्या सर्वांगीण विकासाचे धोरण राबवून येणाऱया काळात विकासासोबत मराठी अस्मिता व भाषा टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मतदारांना दिला आहे. त्यांच्या विजयासाठी गल्लीतील कार्यकर्त्यांसोबत प्रभागातील इतर युवक मंडळांचे कार्यकर्ते काम करत आहेत.