प्रतिनिधी / कारवार
कारवार विधानसभा मतदार संघातील अंकोला नगरपंचायत पदाधिकाऱयांच्या निवडणुकीत काँग्रेसचे निवडून आलेले उमेदवार भाजप उमेदवारांच्या तुलनेत अधिक असूनही पदाधिकाऱयांच्या निवडणूकीत काँग्रेसला अपयश आहे. कारवार विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागून राहिलेल्या अंकोला नगरपंचायत पदाधिकारी निवडणूकीत भाजपला अपक्ष उमेदवारांची साथ लाभल्याने अध्यक्षपदी भाजपच्या शांतला नाडकर्णी तर उपाध्यक्षपदी रेखा गावकर निवडून आल्या. अंकोला नगरपंचायत सदस्यांची संख्या 23 इतकी आहे. गेल्या दीड दोन वर्षापूर्वी अंकोला नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे दहा भाजपचे आठ आणि पाच अपक्ष उमेदवार निवडून आले होते. अंकोलानगर पंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस तसेच भाजपला अपक्ष उमेदवारांच्या समर्थनाची गरज होती. भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी रेखा गांवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काँग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी मंजुनाथ नाईक आणि उपाध्यक्षपदी जैनबी बेंग्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकाऱयांनी हात उंचावून मतदान करण्याची सूचना केली असता शांतला नाडकर्णी यांना 14 मते मिळाली तर रेखा गांवकर यांनाही 14 मते मिळाली. यामध्ये भाजपच्या 8, अपक्ष उमेदवारांयच पाच आणि कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांच्या एका मताचा समावेश होता. काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार मंजुनाथ नाईक आणि जैनबी बेंग्रे यांना काँग्रेसची दहा मते मिळाली.
मतदार संघतील दोन्ही स्थानिक संस्थे भाजपला मिळवून देण्यात आमदार नाईक यांना यश
दरम्यान कारवार विधानसभा मतदार संघातील कारवार नगरपालिका आणि अंकोला नगरपंचायतची सत्ता भाजपकडे खेचून आणण्यात कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांना यश आहे. दोन्ही ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. कारवार नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी निजदच्या आणि अपक्ष उमेदवारांची मदत घेण्यात आली. तर अंकोला नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपने अपक्षांची मदत घेतली जे भाजपला जमले ते काँग्रेसच्या नेत्यांना जमले नाही, अशी चर्चा आता येथे रंगली आहे. त्याच बरोबर दोन्ही स्थानिक संस्थांची सुत्रे भाजपकडे खेचून आणून आमदार नाईक यांनी आपले नेतृत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अर्थात हे शक्य करण्यासघ्टी आमदार नाईक यांना भाजपच्या जिल्हय़ातील अन्य नेत्यांची साथ लाभली हे नाकारता येत नाही.