चार संशयितांसह दोन कारगाडय़ा, चार मोबाईल संच ताब्यात
प्रतिनिधी/ कारवार
हुबळीहून जिल्हय़ातील अंकोलाकडे विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे 2 कोटी 68 लाख रुपये किमतीची ब्राऊनशुगर (हेरॉईन) जप्त करण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू यांनी दिली.
देवराजू आपल्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ही कारवाई मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेगुळ्ळी फाटय़ाजवळ पोलीस निरीक्षक निश्चलकुमार डी. एम. यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या प्रकरणी विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली 2 किलो 680 ग्रॅम इतकी ब्राऊनशुगर, दोन कार, चार मोबाईल फोन जप्त करून चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी सिद्धापूर आणि अंकोला तालुक्मयातील आहेत.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे नारायण रामकृष्ण भागवत (वय 35, रा. कल्लेश्वर, ता. अंकोला), चंद्रकांत दयानंद गुणगा (वय 29, रा, कल्लेश्वर, ता. अंकोला), वीरभद्र सुब्राय हेगडे (वय 43, रा. हाविनमने, क्मयादगी, ता. सिद्धापूर) आणि प्रवीण मंजुनाथ भट (वय 30, रा. हळ्ळेबैल, ता. सिद्धापूर) अशी आहेत.
या प्रकरणाबद्दल शिवप्रकाश देवराजू यांनी दिलेली अधिक माहिती अशी, कारवार जिल्हा अपराध गुप्त वार्ता खात्याचे पोलीस निरीक्षक निश्चलकुमार डी. एम. यांना अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुबळी-अंकोला राष्ट्रीय महामार्गावरून हुबळीहून अंकोलाकडे (केए 31, एन 1648) आणि (केए 05, पी 2470) कारमधून विक्रीसाठी ब्राऊनशुगरची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती.
निश्चलकुमार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा सुरू ठेवली असताना अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेगुळ्ळी फाटय़ाजवळच्या एस. एस. शेट्टी अँड सन्स पेट्रोलपंपाजवळ हुंडाई आय-10 आणि मारुती-800 या दोन कारगाडय़ा आढळून आल्या. विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या याच कार असल्याची खात्री पटताच निश्चलकुमार आणि सहकाऱयांनी कार ताब्यात घेऊन कसून तपासणी केली असता 2 किलो 680 ग्रॅमच्या पांढऱया कपडय़ात ठेवण्यात आलेली ब्राऊनशुगर आढळून आली. या ब्राऊनशुगरची किमत 2 कोटी 68 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत पीएसआय विन्सन फर्नांडिस, पोलीस कर्मचारी सदानंद सावंत, गणेश नाईक, रुद्रेश मेत्राणी, माधव नायक आदी सहभागी झाले होते.
अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई
विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली 2 कोटी 68 लाख रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करणे ही कारवार जिल्हा पोलिसांची अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही वाहतूक नेमकी कुठे केली जात होती? या मागील सूत्रधार कोण? वाहतुकीच्या पाठीमागे मोठी टोळी तर कार्यरत नाही ना? आदी प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून मिळणार आहेत. अंकोला पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे.