प्रतिनिधी / बेळगाव
अंगडी वाणिज्य आणि तांत्रिक महाविद्यालयात क्रिएटिव्ह क्लबचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिकण्यासाठी आपल्याकडे अनेक भाषा आहेत. सर्व भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात पण मातृभाषेला विसरू नये. तंत्रज्ञान कितीही बदलले तरीही आपल्या भावना, संस्कृती, संस्कार यांचा विसर पडू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी सीमा होसमठ यांनी स्वागतगीत सादर केले. मुजम्मील जमादार यांनी स्वागत केले. प्राचार्या संगीता देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. शन्मुख कुचबाळ, पीयुसी विभागाचे प्रा. नागेश्वर डेमुनकोप्प, प्रा. शिवप्रसाद भगवंतण्णावर, प्रा. निंगाप्पा सबरद, प्रा. संजीव कुमारमठ, क्रिएटिव्ह क्लबचे प्रमुख डॉ. गिरीष होसूर, कॉलेजचे सचिव मुजम्मील जमादार, महिला प्रतिनिधी सीमा कोरजकर, तसेच अंगडी कॉलेजचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. निधी कस्तुरी व स्वाती हेगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका तारिहाळ यांनी परिचय करून दिला. समृद्धी काटे यांनी आभार मानले.