अंगणवाडय़ांचा होतोय दुरूपयोग, चक्क मसाज सेंटरमध्ये रूपांतर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे बंद झालेल्या अंगणवाडय़ांचा दुरूपयोग सुरू असून अंगणवाडय़ांचे चक्क मसाज सेंटरमध्ये रूपांतर करून राजरोसपणे पैसे उकळण्याचा धंदा सुरू झाला आहे. ही धक्कादायक बाब अधिकाऱयांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. बाहेरून लाभार्थींना धान्य वितरण करायचे व आतमध्ये मसाज सेंटर चालवायचे असा लाजीरवाणा प्रकार काही अंगणवाडय़ांमध्ये सुरू झाला आहे. शहरातील अत्यंत प्रति÷sच्या वसाहतीमध्ये असणाऱया अंगणवाडीमध्ये आतल्या बाजूने चक्क मसाज सेंटर चालविले जात आहे.
कोरोनामुळे अंगणवाडय़ा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अंगणवाडय़ांच्या मार्फत गर्भवती व बालकांना धान्य, पौष्टिक आहार वितरित केला जातो. लॉकडाऊननंतर अंगणवाडय़ा काही दिवसांसाठी सुरूही झाल्या होत्या. परंतु पुन्हा कोरोनामुळे अंगणवाडय़ा बंद करण्यात आल्या.
शहरात एकूण 376 व ग्रामीण भागात 674 अंगणवाडय़ा आहेत. गर्भवती, बाळंतीण व बालकांना अंगणवाडीतर्फे आहार व धान्य दिले जाते.
तिसऱया महिन्यामध्ये गर्भवतीची नोंदणी करून घेतली जाते. व पुढील सहा महिने तिला आहार दिला जातो. तसेच प्रसूती झाल्यानंतर सहा महिने आहार दिला जातो. तर सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी आहार दिला जातो.
सध्या कोरोनामुळे अंगणवाडी बंद असल्या तरी गर्भवती, बाळंतीण व बालकांचे हाल होऊ नयेत म्हणून अंगणवाडीमार्फत धान्य वितरित केले जाते. लाभार्थी महिला हे धान्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये येतात, परंतु त्यांना बाहेरच्या बाहेरच धान्य देऊन पाठविले जात आहेत. शहरातील अत्यंत प्रति÷sच्या वसाहतीमध्ये असणाऱया अंगणवाडीमध्ये आतल्या बाजूने चक्क मसाज सेंटर चालविले जात आहे.
दुर्दैवाने मसाज संदर्भात कोणतेही प्रशिक्षण नाही, कोणताही परवाना नाही मात्र पैसे उकळण्याच्या नादात चक्क परस्पर संगनमताने महिलांचा मसाज करून दिला जाईल असे सांगून हा धंदा बिनदिक्कत सुरू आहे. लाभार्थी महिलांना आतमध्ये काही गुफ्तगु चालले आहे असा अंदाज आल्याने त्यांच्यापैकी काहीनी विचारणा केली. त्याचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हाकलून देण्यात आले.
अधिकाऱयांशी संपर्क साधता त्यांना याबाबत कोणतीच कल्पना नाही. जर काही गैरप्रकार आढळून आले तर आपण नक्की कारवाई करू असे त्यांनी तरुण भारतला सांगितले. अलिकडच्या काळात मसाज सेंटर, पार्लर, असे फलक लावून तेथे गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मसाज सेंटर व पार्लरचे निकष कोणते आहेत. त्यानुसार त्यांचे कामकाज चालते का? याची पाहणी महानगरपालिकेने करणे आवश्यक ठरत आहे. सध्या अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आपल्याला कोण विचारणार असा विचार करून हे प्रकार सुरू आहेत.