पांगुळ गल्ली येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
पांगुळ गल्ली येथील एका अंगणवाडी शिक्षिकेच्या घरात घुसून चोरटय़ाने वॅनिटी बॅग पळविली आहे. शनिवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
कविता तुकाराम कुंडेकर यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास कविता दर्शनी दरवाजा उघडा ठेवून बेडरुममध्ये गेल्या होत्या. त्यांची वॅनिटी बॅग बाहेरच्या खोलीत होती. घरात शिरलेल्या चोरटय़ाने ही बॅग पळविली आहे. बॅगमध्ये एक मोबाईल, बँक पासबुक, 1500 रुपये रोख रक्कम होती. मोबाईल, रोकड काढून घेऊन चोरटय़ाने ती बॅग दुसऱया मजल्यावर टाकून तेथून पलायन केले आहे. कविता या पहिल्या मजल्यावर राहतात. या संबंधी मार्केट पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.