एक गट संपावर, दुसरा गट सरकारच्या बाजूने
प्रतिनिधी /पणजी
अंगणवाडी सेविकांचे दोन गट झाले असून एक गट आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर संप करीत आहेत तर दुसरा गट सरकारने वेळोवेळी अंगणवाडि सेविकांना सहकार्य केले असल्याचे सांगून सरकारचे गुण गात आहे. सध्या निवडणूका जवळ आल्या असल्याने विविध राजकीय पक्ष अंगणवाडी सेविकांच्या संपाचा सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढण्यासाठी लाभ घेत आहेत. अधिकाधिक राजकीय पक्षानी अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन सत्तेत आल्यावर मानधनात वाढ करण्याचे आश्वासन देत आहेत.
अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी सेविकांच्या हितासाठी गेल्या तीस वर्षापासून कार्यरत आहे. वेळोवेळी सरकारकडे सेविकांच्या मागण्या मांडून काहीप्रमाणात त्यांची पूरतताही करून घेतलेली आहे. असे संघटनेच्या अध्यक्षा सुनिता मुरगावकर यांनी सांगितले. सरकार अंगणवाडी सेविकांना वेळोवेळी योग्य सहकार्य करीत आहे. कोविड काळातही सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन बंद केले नाही असेही मुरगावंकर म्हणाल्या.
काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनिता मुरगावकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत संघटनेच्या सचिव नेहा दिवकर, उपाध्यक्ष रजनी धुरी, सहसचिव ज्योती शिरोडकर खजिनदार वैभवी तळवणेकर व अन्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. आज काही अंगणवाडी सेविकांनी वेगळा करून सेविकांच्या मांगण्यासाठी आझाद मैदानावर संप करीत आहेत. अखिल गोवा राज्या कर्मचारी संघटना व पदाधिकाऱयांना बदनाम करण्याचे काम करीत आहेत. वास्तविक निवडणूका जवळ आल्याने हा एक राजकीय डाव असल्याचे मुरगावकर म्हणाल्या.
अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ही एकमेव अंगणवाडी सेविकांची संघटना असून ती आजतगायत कार्यरत आहे. असे असताना दुसरी संघटना झालीच कशी असा प्रश्न मुरगावकर यांनी उपस्थित केला आहे. अंगणवाडी सेविकांच्या हितासाटी संघटनेने सरकारसमोर ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्यातील मानधन वाड करण्याची मागणी सरकारने मान्य करून वेळोवेळी मानधनात वाढही केली आहे. अगोदर प्रत्येक अंगणवाडी सेविकेला सुरूवातील सहा हजार मानधन मिळत होत नंतर त्या सेविकेने 25 वर्षे सेवा बजावली की तिला 9 हजार मानधन मिळत होत. सध्या स्थितीत प्रत्येक सेविकेला सुरुवातीचे मानधन 10 हजार आहे. दर पाच वर्षाने मानधनात वाड होते व 25 वर्षे सेवा बजावल्यानंतर त्या सेविकेला 18 हजार रुपये इतके मानधन दर महिन्याला मिळत आहे. या शिवाय निवृत्ती लाभ बाबतही सरकारकडे बोलणी झाली असून त्याच्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणे योग्य की अयोग्य हे त्यांनीच ठरवावे मात्र आमची विनाकारण बदनामी करू नये असेही मुरगाकर म्हणाल्या.
दरम्यान आझाद मैदानावर संप करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संघटनेशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की सध्याची वाढती महागाई आणि मिळणारे मानधन याचा ताळमेळ बसत नसल्याने मानधनात वाढ करणे हीत आमती मुख्य मागणी आहे. गेल्या दहा वर्षापासून मानधनाच वाढ केली नाही. अंगणवाडीच्या कामा व्यतीरीक्त इतर सरकारी कामेही आम्हाला करावी लागतात. त्याचा मोबदला आम्हा दिला जात नाही. त्याच कामाचे इतरांना कंत्राट देतात तेव्हा त्यांना भरमसाठ मोबदला दिला जातो. अनेक राजकीय पक्षांनी त्याना पाठींबा जाहिर केला असून गेल्या कित्येक दिवसापासून त्यांचा संप आझाद मैदानावर सुरु आहे.
अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ही कायदेशीर बरखास्त झाली असल्याचा लेखी पुरावा आमच्याकडे असून त्याच्याच आधारे अंगणवाडी सेविकांनी दुसरी संघटना स्थापन केला आहे. त्या संघटनेच्या झेंडय़ाखाली गेल्या कित्येक वर्षापासून अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबीत असलेल्या मागण्यासाठी संप सुरु असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.