प्रतिनिधी/बांदा-
बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभापती शर्वाणी गावकर यांनी दिले आहे.
यावेळी स्वतः बांदा येथे येऊन अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याने सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, आदी उपस्थित होते.