वरुण धवनच्या पुतणीला करण जौहर देणार संधी
अभिनेता वरुण धवनची पुतणी अंजिनीला देखील करण जौहर बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी देणार असल्याचे त्त आहे. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सनी पदार्पण केले आहे. यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि सारा अली खान सामील आहे. याचबरोबर शनाया कपूर, अहान पांडे आणि अहान शेट्टी देखील लवकरच चित्रपटांमधून दिसून येणार आहेत.
अंजिनी धवनही आता चित्रपटांमधून झळकणार आहे. करण जौहर स्वतःच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तिला लाँच करणार आहे. अंजिनी ही दिग्दर्शक डेव्हिड धवनची नात आहे. अंजिनीने बॉलिवूड पदार्पणासाठी तयारीही सुरू केली आहे. अंजिनीकडे 4-5 चित्रपटांचे प्रस्ताव असल्याचे समजते. तिचा पहिला चित्रपट 2022 किंवा 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. अंजिनी सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. ती स्वतःची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असते.