प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या लसीकरण करण्यालाही प्राध्यान्य देण्यात येत आहे. येथील अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेत नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून या संस्थेत 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
ही संस्था नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी सज्ज असते. रुग्णांची सेवा असो अथवा ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुढाकार असो या संस्थेने नेहमी मदतीचा हात दिला आहे. गेल्या आठवडय़ापासून संस्थेच्या कार्यालयात लसीकरणासाठी पंधराशेच्यावर नागरिकांनी नावे नोंदविली
आहेत.
तसेच आतापर्यंत या संस्थेच्यावतीने जवळपास 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दररोज व्हॅक्सिनच्या पुरवठय़ानुसार नागरिकांना बोलविण्यात येत आहे. सदर व्हॅक्सिनेशनचे काम अमान सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.