मुंबईच्या तुलनेत दुप्पटीहून मोठा आकार
वैज्ञानिकांनी सुमारे 10 वर्षांच्या परिश्रमानंतर अंटार्क्टिकात आलेल्या पहिल्या तडय़ाचा शोध लाला आहे, याच्यामुळे आइस शेल्फमधून एक विशाल हिमखंड (आइसबर्ग) तुटला आहे. या हिमखंडाचा आकार मुंबई शहरापेक्षा दुप्पटीने अधिक आहे. ही घटना नोव्हेंबर 2020 मध्ये आइस शेल्फवर पडलेल्या एका मोठय़ा भेगेनंतर घडली आहे. 26 फेब्रुवारी रोजी हा हिमखंड पूर्णपणे तुटून वेगळा झाला आहे. हे स्थान ब्रिटनच्या सायंटिफिक आउटपोस्टपासून फार अंतरावर नाही.
‘नॉर्थ रिफ्ट’ भेग मागील दशकात ब्रंट आइस शेल्फमध्ये सक्रीय स्वरुपात सर्वात महत्त्वाचा हिस्सा होता. याचमुळे ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाच्या (बीएएस) वैज्ञानिकांना हा वेगळा होण्याची पूर्ण अपेक्षा होता. या हिमखंडाचा आकार 1,270 चौरस किलोमीटर आहे. तर मुंबईचा आकार 603 चौरस किलोमीटरच आहे.
ब्रंट आइस शेल्फमधून एक हिमखंड वेगळा होण्यासंबंधी आमची पथके पूर्णपणे तयारी होती. आगामी आठवडे किंवा महिन्यांमध्ये हिमखंड मूळ हिस्स्यापासून दूर जाऊ शकतो. किंवा हा चहुबाजूने ब्रंट आइसबर्गच्या नजीक राहू शकतो असे बीएएसचे संचालक डेम जेन फ्रान्सिस यांनी सांगितले आहे.
अंटार्क्टिकाच्या नॉर्थ रिफ्टमध्ये प्रतिदिन सुमारे 0.6 मैल (1 किलोमीटर)च्या वेगाने ईशान्येच्या दिशेने भर पडत आहे. पण 26 फेब्रुवारी रोजी सकाळी काही तासांतच काहीशे मीटर रुंदीचे अंतर निर्माण झाले आहे. हे बर्फ विभाजन एका नैसर्गिक प्रक्रियेमुळे घडले असून हवामान बदलाची यात भूमिका असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी सरकतो बर्फाचा थर
492 फूट जाडीचा (150 मीटर) बर्फाचा स्लॅब असलेला ब्रंट आइस शेल्फ दरवर्षी 1.2 मैल (2 किलोमीटर) पश्चिमेला वाहतो आणि नियमित स्वरुपात हिमखंडांना शांत करतो. अंटार्क्टिकात बर्फाचा मोठा हिस्सा वेगळा होणे सामान्य आहे.