ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या फैलावापासून दूर राहिलेल्या अंटार्क्टिका खंडावरही आता कोरोना पोहचला आहे. अंटार्टिकाच्या रिसर्च सेंटवर 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अंटार्क्टिकात अनेक देशात रिसर्च बेस आहेत. चिलीमधून 27 नोव्हेंबर रोजी काही सामान अंटार्क्टिकामध्ये पोहोचले होते. अंटार्क्टिकात सामान उतरवल्यानंतर जेव्हा लोक परतले तेव्हा काही दिवसांनी क्रू मेंबर्समध्ये कोरोना व्हायरस सापडला.
अंटार्क्टिकात सध्या 36 कोरोना रुग्ण असून, त्यामधील 26 रुग्ण चिली सेनेचे तर 10 जण मेंटेनन्सचे कर्मचारी आहेत. या रुग्णांना चिली सेनेने परत बोलावले आहे.