दिल्ली एम्समध्ये करण्यात आले दाखल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगातून दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापूर्वी तुरुंगातील वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला तेथून हलवावे लागल्याची माहिती तुरुंग अधिकाऱयांनी न्यायालयाला दिली आहे. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण झाल्यापासून छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. मुंबईत त्याच्याविरोधात नोंद असलेले सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच त्याच्याविरोधात खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. छोटा राजनच्या विरोधात अपहरण, हत्या, तस्करीशी संबंधित 70 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 1993 च्या मुंबईतील साखळी स्फोटांप्रकरणातील आरोपी हनीफ कडावालाच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या सहकाऱयाची 22 एप्रिल रोजी निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनच्या निर्देशावर कडावालाने मुंबईत शस्त्रास्त्रs आणली होती. या शस्त्रास्त्रांचा वापर 1993 च्या बॉम्बस्फोटांदरम्यान झाला होता. या स्फोटांमध्ये 250 हून अधिक जण मारले गेले होते.