नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
छोटा राजन याला 22 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता देखील छोटा राजनने पोटदुखीची तक्रार केल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे.
छोटा राजन याला 2015 साली अटक करण्यात आली होती. इंडोनेशिया येथून प्रत्यार्पण करण्यात आल्यावर त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली होती. छोटा राजन याच्यावर खून, खंडणीसारखे सुमारे 70 गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. 2011साली मुंबईत पत्रकार डे यांची हत्या झाली होती त्या प्रकरणातही छोटा राजनचा हात होता.