ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर दाऊदचे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पत्नी मेहजबीन उर्फ झुबिना जरीनही कोरोना पॉझिटिव्ह आहे. दोघांनाही कराचीच्या मिलटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. कराचीत रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय. परंतु, पाकिस्तानकडून सातत्याने हे वृत्त फेटाळले जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वृत्त खरे असून दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याने दोघांनाही कराचीत मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून दाऊद पाकिस्तानात वास्तव्यास आहे. भारताने याचे वारंवार पुरावे देऊनही पाकिस्तानने हे मान्य करण्यास नकारच दिलाय.