नवी दिल्ली :
गगनयानातून अंतराळात झेप घेण्यासाठी भारतीय वायुदलाच्या 4 वैमानिकांची निवड झाली आहे. विशेष प्रशिक्षणासाठी हे वैमानिक लवकरच रशियाला जाणार आहेत. या वैमानिकांच्या अंतराळ मोहिमेकरता विशेष खाद्यपदार्थ तयार करण्यात आले आहेत. डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने विशेष प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ अंतराळवीरांसाठी तयार केले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेला मूर्त स्वरुप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेल्या 2022 च्या कालमर्यादेचे पालन करण्यासाठी इस्रोने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
गगनयानातून अंतराळात जाणाऱया अंतराळवीरांसाठी कोणकोणते खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भारतीय अंतराळवीरांना एग रोल्स, व्हेज रोल्स, इडली, मुग डाळीचा हलवा तसेच व्हेज पुलाव असे खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. याचबरोबर ज्यूस आणि पाणीही सोबत दिले जाणार आहे.
हीटरची सुविधा
गगनयानात खाद्यपदार्थ गरम करण्यासाठी हीटरची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. अंतराळात पृथ्वीची गुरुवात्कर्षण क्षमता क्षीण होत असल्याने गगनयानात विशेष प्रकारची भांडी उपलब्ध केली जाणार आहेत. या भांडय़ांमध्ये अंतराळवीर स्वतःचे खाद्यपदार्थ ठेवू शकतील.
अंतराळवीरांना रशियात ‘असे’ मिळणार प्रशिक्षण स्वरुप
गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या 4 अंतराळवीरांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी), एकाकीपणा (आयसोलेशन)आणि स्थितीभ्रम (डिसऑरियंटेशन) हाताळण्याचे प्रशिक्षण या अंतराळवीरांना दिले जाणार आहे. याकरता भारतातील इन्स्टिटय़ूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीन आणि रशियातील युए गागरिन अँड टेस्ट कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अनेक सिम्युलेटर्स काम करत आहेत.
गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील बदलांमुळे निर्माण झालेली स्थिती सहन करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अंतराळवीरांना सेंट्रीफ्यूजेज आणि सेंट्रीफ्यूजेज आधारित सिम्युलेटर्समध्ये ठेवले जाणार आहे. सेंट्रीफ्यूज तयार करणाऱया निवडक देशांच्या गटात भारत सामील आहे. आयएएमने उच्च गुरुत्वाकर्षण बळ तयार करणाऱया सेंट्रीफ्यूजची निर्मिती केली आहे. गागरिन सेंटरमध्येही अशाप्रकारचे दोन सेंट्रीफ्यूज आहेत.
हवेत तरंगणाचे प्रशिक्षण
गागरिन सेंटरचे भारहीन वातावरण अभ्यास पेंद्र (वेटलेस इन्व्हॉयन्मेंट ट्रेनिंग फॅसिलिटी) किंवा हायड्रो लॅबमध्ये पाण्यात भारहीनतेची (सिम्युलेटेडर वेटलेसनेस) स्थिती निर्माण केली जाते. तेथे बाहय़ अंतराळात मदतीसह अनेक प्रकारचे प्रशिक्षण अंतराळावीरांना दिले जाते. फ्लाइंग लॅबही गगनयात्रींच्या प्रशिक्षणाचा भाग असणार आहे.
अंतराळयान हाताळणी
गगनयात्रींना सर्व यंत्रणा, दिशादर्शन आणि थर्मल कंट्रोल, ऑर्बिटल मॅकॅनिक्स तसेच अर्थ ऑब्झर्व्हेशन इत्यादी संकल्पना जाणून घ्याव्या लागणार आहेत. गगनयात्रींना आपत्कालीन प्रशिक्षणाचा वापर करावा लागू नये अशी इस्रो आणि भारतीय वायुदलाची इच्छा आहे. पण आवश्यक हालचाली आणि आपत्कालीन स्थितीचे प्रशिक्षण गरजेचे असते. गगनयात्रींना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्राची जुजबी माहिती असणे आवश्यक आहे.