इस्लामिक रेव्हॉल्युशन गास्स कॉर्प्सचा दावा
वृत्तसंस्था / तेहरान
इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची काही दिवसांपूर्वी हत्या घडवून आणली गेली होती. याप्रकरणी इस्लामिक रेव्हॉल्युशन गार्ड्स कॉर्प्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल रमजान शरीफ यांनी खळबळजनक दावा केला आहे. मोहसिन यांची हत्या उपग्रहाद्वारे नियंत्रित होणाऱया शस्त्राद्वारे घडवून आणली गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. फखरीजादेह हे इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे सारथ्य करत होते.
फखरीजादेह यांच्यापासून 150 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या वाहनात उपग्रह नियंत्रित शस्त्र ठेवण्यात आले होते. घटनास्थळी अन्य कुणीच व्यक्ती उपस्थित नव्हता. ही हत्या उपग्रहाने नियंत्रित होणाऱया अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणाने घडवून आणली गेल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे.
इराणने फखरीजादेह यांच्या हत्येचा आरोप इस्रायलवर केला होता. इस्रायलच्या मोसाद या हेरयंत्रणेनेही ही हत्या केल्याचा दावा करण्यात आला होता.