प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांची अंतर्गत बदली करण्यापूर्वी आयुक्तांच्या निदर्शनास आणणे बंधनकारक आहे. मात्र, आयुक्तांची परवानगी न घेता महसूल विभागातील कार्यालय व्यवस्थापकाचा कार्यभार अन्य कर्मचाऱयांवर सोपविण्यात आला आहे. सदर कर्मचाऱयाला आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि महसूल उपायुक्तांचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
महापालिका कार्यालयातील कार्यभार सोपविण्याच्या मुद्दय़ावर वाद अद्यापही सुरूच आहे. महसूल विभागातील काही महसूल निरीक्षक आणि कर्मचाऱयांना पदमुक्त करून त्यांच्याकडील कार्यभार अन्य कर्मचाऱयांकडे सोपविला होता. अन्य विभागांची जबाबदारी सोपविण्याचा प्रकार सुरू होता. काही कर्मचारी आपल्या सोयीच्या पदी बदली करवून घेत होते. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱयांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. महापालिका कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱयांची बदली करण्यापूर्वी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याची नोटीस सर्व विभागप्रमुखांना बजावण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱयांकडून झाला आहे. महसूल विभागातील कार्यालय व्यवस्थापक फारुक यड्रावी यांच्याकडे क्वॉरंटाईनची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याच दरम्यान त्यांच्याकडील कार्यभार कमी करून भूखंड विभागाचे कामकाज पाहणाऱया नरगट्टी नामक कर्मचाऱयांकडे सोपविण्याचा आदेश महसूल उपायुक्तांनी बजावला आहे. पण सदर अंतर्गत बदलीबाबत महसूल उपायुक्तांनी आयुक्तांना कोणतीच माहिती दिली नाही. याबाबत नरगट्टी यांनीही आयुक्तांना माहिती न देता व्यवस्थापकपदाचा कार्यभार घेऊन कामकाज चालविले. त्यामुळे नरगट्टी यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नेटीस बजावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परिणामी महापालिका कार्यालयातील अधिकाऱयांचा वाद उफाळून आला आहे. बदली प्रकरणी कर्मचाऱयांना नेटीस बजावण्यात आली आहे. पण आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन अधिकाऱयांनी केले आहे. त्यामुळे अधिकाऱयांना जाब कोण विचारणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.