ओस्लो (नॉर्वे) : येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताची 19 वर्षीय महिला मल्ल अन्शू मलिकने 57 किलो वजनगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना सोलोमिया व्हॅनेकचा पराभव केला. विश्व कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी अन्शू मलिक ही भारताची पहिली महिला मल्ल ठरली आहे. या स्पर्धेत दुसऱया एका वजनगटातील लढतीत भारताच्या सरिता मोरला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या 57 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत भारताच्या 19 वर्षीय अन्शू मलिकने सोलोमिया व्हॅनेकचा तांत्रिक गुणांवर पराभव करत अंतिम फेरी गाठली.
भारताच्या सरिता मोरचा उपांत्य लढतीत बल्गेरियाची मल्ल डुडोव्हाने 3-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. सरिता आता कांस्यपदकासाठी लढत देईल.