श्रीनगर / वृत्तसंस्था
अंदमान आणि निकोबार बेटांच्या कॅम्पबेल उपसागरात आणि जम्मू-काश्मीर परिसरात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप दुपारी 12.46 च्या सुमारास झाला. तसेच जम्मू-काश्मीरपासून 84 किमी पूर्वेला कटरा येथे पहाटे 3.02 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. सध्या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गेल्या चार आठवडय़ातील भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पाचवी घटना असल्याची माहिती देण्यात आली.