पंजाब/प्रतिनिधी
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि गांधी कुटुंबाच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबिना सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असल्याचं म्हंटलं आहे.
काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजबाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे अशी भावना व्यक्त केली आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेदांचा एक अध्याय संपला असला तरी येत्या चार महिन्यात तिथे निवडणुका होणार असल्याने पक्षासाठी अनिश्चिततेचा नवा अध्याय सुरु झाल्याची चर्चा आहे