प्रतिनिधी / कोल्हापूर
अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शहरातील 34 कॉलेजमधील 14680 जागांसाठी राबवण्यात आली. पहिल्या फेरीत 4211 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर दुसऱया फेरीतील गुणवत्ता यादीनुसार 5278 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयात प्रवेश ऍलॉट केले आहेत. त्यामुळे दुसऱया फेरीअखेर 4105 जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चौगुले म्हणाले, अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश फेरी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील 9383 जागेसाठी राबवण्यात आली. या फेरीत 5278 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसऱया फेरीअखेर विज्ञान शाखेत जास्त मागणी असलेल्या महाविद्यालयांचा 1 ते 2 टक्केंनी कटऑफ पॉईंट वाढला आहे. तर इतर महाविद्यालयांमध्ये सरासरी 1 टक्केंनी कटऑफ पॉईंट घसरला आहे. वाणिज्य इंग्रजी शाखेसाठी कॉमर्स कॉलेजमध्ये ओपनच्या 17 तर विवेकानंद कॉलेजमध्ये 45 आणि डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये 70 ओपनच्या विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातून प्रवेश देण्यात आले आहेत.
कॉमर्स मराठी शाखेत मागणी असलेल्या कॉलेजला 2 टक्केंनी वाढ तर इतर कॉलेजमध्ये 13 ते 23 टक्केंनी घट झाली आहे. कला शाखेला क्षमतेपेक्षा खूपच कमी अर्ज आले आहेत त्यामुळे कला इंग्रजी शाखेत 39 जागा तर कला मराठी शाखेत 2258 जागा शिल्लक आहेत. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी मिळलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक चौगुले यांनी केले आहे. यावेळी प्राचार्य ए. एस. रामाणे, डॉ. डी. बी. खाडे, देवेंद्र भोसले, गणेश काटकर उपस्थित होते.
दुसऱ्या फेरीत शाखानिहाय प्रवेश अर्ज, रिक्त जागा
शाखा प्रवेश रिक्त जागा
कला इंग्रजी 25 39
कला मराठी 479 2258
वाणिज्य इंग्रजी 732 134
वाणिज्य मराठी 880 1501
विज्ञान 3162 173
एकूण 5278 4105
ग्रामीण भागातील 25 टक्के विद्यार्थ्यांनी घेतला स्थानिक पातळीवर प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांबरोबर बससेवाही सुरळीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील 25 टक्के मुल आणि मुलींनी शहराकडे न येता स्थानिक पातळीवर प्रवेश घेण्यास पसंदी दिली आहे. त्याचबरोबर बहुतांश विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक, आयटीआय, कृषि पदविका, पॅरामेडीकल यासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे शहरातील 34 महाविद्यालयात 4105 जागा शिल्लक राहिल्या आहेत.
ओपच्या विद्यार्थ्यांना संगवर्गनिहाय दिलेल्या जागा
संवर्ग शिल्लक जागा
ईडब्ल्यूएस 363
एससी 205
एसटी 206
व्हीजेएनटी-ए 74
एनटी-बी 52
एनटी-सी 73
एनटी-डी 55
ओबीसी 428
एसबीसी 68
एकूण 1524