ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी परीक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत ही प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली आहे.
आता सगळेच जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जातील वापरता येणार आहे तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरता येईल. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना लॉगिन आयडी आणि पासवर्ड ऑनलाईन उपलब्ध करून दिला जाईल सर्व प्रकारच्या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीन असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रकाश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी www.dydepune.com आणि https://Pune.11thadmission.org.in वेबसाईट वर संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.