ऑनलाईन टीम /अकोला :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच अकोल्यामधून चिंता वाढवणारी बातमी येत आहे. अकोला जिल्ह्यात आज 5 मे रोजी आणखी 11 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुगांची संख्या 75 वर पोहचली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 11 रुग्णांमधील चार जण मोहम्मद अली रोड भागातील असून अन्य दोन जण बैदपुरा येथील आहेत. तर बाकीचे गुलजारपुरा, ताजनगर, कृषीनगर, पिंजर आणि खंगनपुरा येथील रहिवाशी आहेत.
75 पैकी 55 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात हे रुग्ण संख्या वाढत असल्याने अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.