ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात शुक्रवारी सकाळी आणखी 13 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1841 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 210 अहवाल प्राप्त झाले होते त्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर अन्य 197 जणांचे निगेटिव्ह आले. आज आढळलेल्या 13 जणांमध्ये 7 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. त्यातील तिघे अकोट, तीन जण बाळापूर, दोन जण कृषीनगर तर अन्य कावसा, तारफेल व पातुर मधील प्रत्येकी एक जण या प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 91 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1369 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 381 जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.