ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यातील शासकीय रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताने गळा चिरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे घडला.
मोहम्मद जहरुल इस्लाम (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्लाम हा तरुण 7 एप्रिलला कोरोना संशयित म्हणून अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाला. उपचारादरम्यान त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. शुक्रवारी त्याचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला. आज पहाटे त्याने रुग्णालयातच गळा चिरून आत्महत्या केली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.