ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात शुक्रवारी सकाळी 15 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1121 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 216 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 201 अहवाल निगेटिव्ह तर 15 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आतापर्यंत एकूण 59 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
आज सापडलेल्या 15 रुग्णांमध्ये 8 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोटफैल येथील 5, बाळापूर 4, तर जेतवन नगर, भारती प्लॉट, कान्हेरी सरप, जुने शहर, मोठी उमरी, बार्शी टाकळ येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यातील एकूण 1121 रुग्णांपैकी 338 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 724 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.