अकोळ –
निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्यावतीने राज्य सरकारने सुरू केलेल्या 112 क्रमांकाविषयी जागृती होण्यासाठी मराठी व कन्नड मुला-मुलींच्या शाळेत कार्यक्रम घेतला. स्वागत एमबीएस मुख्याध्यापिका मंगल कोळी यांनी केले.
दरम्यान, सागर कांबळे यांनी आपत्कालीन घडणाऱया घटना, अपघात, चोरी, महिलांची छेडछाड, हाणामारी आदी घटना निदर्शनास आल्यास शासकीय मदत मिळविण्यासाठी तात्काळ 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर पोलीस खात्याकडून त्वरित मदत देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी केबीएस मुख्याध्यापक बी. जी. लठ्ठे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी हावलदार एम. डी. खोत, एल. एम. रबकवी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.