आवश्यक कागदपत्रासह शनिवार रविवार हजर राहण्याचे आवाहन
अक्कलकोट / प्रतिनिधी
राज्य शासनाने कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा केली होती. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली असून त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तरी अक्कलकोट शहरातील नागरिकांना कळवण्यात येत आहे की,ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोव्हिड १९ या आजाराने मृत पावला आहे. त्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास शासन निर्णय २६ नोव्हेंबर २०२१ नुसार रुपये ५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदती निधीतून प्रदान करण्यात येणार आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागेल त्याची सुविधा अक्कलकोट नगरपरिषद कार्यालयात शनिवार व रविवार या दिवशी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील कागद पत्रे आवश्यक आहेत.
अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, आधार क्रमांक, मृत पावलेल्या व्यक्तीचा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम-१९६९ खालील मृत्यू प्रमाण पत्र तसेच, दवाखान्याचे मृत्यू प्रमाणपत्र, ICMR कोड क्रमांक, इतर निकट नातेवाईंकांचे ना हरकत असल्यांचे स्वयं घोषणापत्र,
वरील सर्व कागदपत्रे घेऊन अर्जदार यांनी दिनांक२५/१२/२०२१ व दिनांक.२६/१२/२०२१ शनिवार व रविवार या दिवशी अक्कलकोट नगरपरिषद कार्यालयात उपस्थित रहावे.अशी माहिती अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.