प्रतिनिधी / बोरगाव
दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सोमवारी सकाळी पुन्हा अक्कलकोटमध्ये नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज आढळून आलेले बाधित रुग्ण या परिसरातील
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील १, करजगी परिसरातील एक, समर्थ नगर भागातील दोन आणि बुधवार पेठ अक्कलकोट भागातील एक यांच्यासह सलगर भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार मरोड यांनी यावेळी केले.