अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट शहर -तालुक्यात 07 जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिली. अक्कलकोट शहर -तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे अक्कलकोटात खळबळ उडाली आहे. अक्कलकोटला आज मंगळवारी एकाच दिवशी पंधरा कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये अक्कलकोट शहरातील जंगी प्लॉट – ५, फत्तेसिंह चौक – ७, बुधवार पेठ – १, चपळगाव – १, नागनहळ्ळी -१
अक्कलकोट शहर -तालुक्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.