सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन: उच्चस्तरीय चौकशी सुरू
प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेता अक्षयकुमारचे नाव समोर आले आहे. यासंदर्भात एनसीबी अधिकाऱयांकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रानी दिली आहे.
एनसीबेने दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली. धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादला अटक केल्यानंतर तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडावर आहेत. यामध्ये एस., ए., आर या अक्षराच्या नावांचा समावेश आहे. ए अक्षरावरून अक्षयकुमारचे नाव समोर आले आहे. ए नावाचा सेलिब्रिटी स्वत: ड्रग्ज घेतो आणि इतरांनाही देतो, असा दावा केला जातो आहे. अक्षयकुमार आणि दीपिकाने चांदनी चौक टू चायना, हाऊसफुल आणि देसी बॉईज या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचे मोबाईल जप्त केले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुल प्रीत सिंहच्या बँक अकाऊंटचा तपास सुरू आहे. एनसीबी आता सर्व ड्रग्ज पॅडलर्सचा जबाबही रिह्यू करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिह्यू केल्यानंतर येणाऱया निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल, असे एनसीबी अधिकाऱयाने सांगितले.