बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला. खिलाडी कुमारचे चाहते व प्रेक्षक या चित्रपटाची अतुरतेने वाटप पाहत होते. याचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते व प्रेक्षकही या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अक्षय कुमार या चित्रपटात एका गुंडाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडीस, कृती सेनन, अरशद वारसी, पंकज त्रिपाठी हेही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून साजिद नाडियाडवाला निर्माता आहेत. बच्चन पांडे 18 मार्च रोजी रिलीज होणार आहेत.
Previous Article‘हिंदू जागा झाला तर दाढीची शेंडी होईल’
Next Article त्रिशतकवीर सकिबूलने रचला नवा इतिहास!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.