ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता अक्षय कुमारचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले असून अक्षयला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर ही माहिती दिली.
ट्विंकलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, सर्वकाही ठीक आहे आणि अक्षयला घरी आलेले पाहून सर्वजण खुश आहेत.
दरम्यान, अक्षय कुमारला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वतः अक्षयने ट्विट करत रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता की, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला चांगले वाटत आहे. पण काही मेडिकल कारणांमुळे मी रुग्णालयात दाखल होत आहे. लवकरच घरी परत येईन, असा विश्वास व्यक्त केला होता.
अक्षय कुमारला ‘रामसेतू’ पिक्चरचे शूटिंग करताना कोरोनाची बाधा झाली होती.