प्रतिनिधी / जोयडा
अखेती (ता. जोयडा) ग्राम पंचायतीवर 13 पैकी 10 जागांवर भाजप उमेदवार निवडून आले आहेत. कॅसलरॉक, शिंगरगाव, नागोडा व नंदिगद्दा या ग्राम पंचायतीवर भाजपचे बहुमत सिद्ध झाले आहे. 16 ग्रा. पं. पैकी 11 ग्राम पंचायतीवर भाजपची सत्ता स्थापित होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
अखेती ग्रा. पं. मध्ये 13 पैकी 10 भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवार 1) दीपक अशोक देसाई, 2) लक्ष्मण सकाराम देसाई, 3) माया सुरेश नाईक 4) श्रीनाथ पुनो मलिक 5) पार्वती महादेव गावडा 6) गुरप्पा हणबर 7) बाजीराव जाधव 8) सरिता सिंगाडे 9) नंदा पवार 10) लक्ष्मी मसणू नाईक 11) पार्वती मारुती नाईक 12) रमेश हणबर.
जोयडा येथे सर्व मतमोजणी करण्यात आली. रामनगर, जगलबेट, बाजारकुणंग, जोयडा, कुंभारवाडा, अवेडा, उळवी व असू या ग्रा. पं. ची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रामनगर ग्रा. पं. मध्ये 21 उमेदवार आहेत. यातील 11 सदस्यांचा निकाल लागलेला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.