सावंतवाडी/प्रतिनिधी:-
सावंतवाडी येथील मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या “त्या” वृद्धाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. मालवण स्कुबा डायविंग पथकाने राबवलेल्या शोध मोहिमेला अखेर यश प्राप्त झाले आहे. जोसेफ लॉरेन फर्नांडिस (६७) रा. खरवतकरटेंब-चराठा असे त्या मयत वृद्धाचे नाव असून संबंधित वृद्धाने बुधवारी सकाळी तलावात उडी घेतली. यावेळी त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी व चप्पल तलावाच्या काठी ठेवली होती. त्यावरून ही घटना उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकाठी केली होती गर्दी केली होती. तर सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मालवण येथील ओम शिव मोरेश्वर स्कुबा डायव्हिंग पथकाच्या साहाय्याने शोध कार्य सुरू केले होते. त्याला अखेर उशिरा या शोध मोहिमेला यश आले.