ऑनलाईन टीम / नगर :
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज अखेर जाहीर माफी मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशा आशयाचे एक पत्रक इंदोरीकर महाराजांनी जारी केले आहे.
दरम्यान, सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरुन अनेकांनी आक्षेप घेतल्यानं वादाला तोंड फुटले.
इंदोरीकर महाराजांनी काढलेल्या या पत्रका म्हटले आहे की, माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. समाज माध्यमांत माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतोय. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!